आता सहज चायना रेडीओ इंटर नेशनल चालत होतो. तिथे मला हा पदार्थ 'गावला'. शांघाय स्नाक्स या नावाजवळ चित्र दिसले तर मनात विचार आला, अरे हा तर आपला मोदक. थोडी माहिती घेतली तर उडालोच. या मोदकात, ज्याचे नाव या संकेतस्थळावर वरील प्रमाणे दिले आहे त्यात हैम, डुकराचे मांस वगैरे जिन्नस घालतात अशी माहिती तिथे दिली आहे. शिवाय इथेच असेही म्हटले आहे, की नानझीआंग या प्रांतात हा पदार्थ १०० वर्षांपासून बनविला जात आहे. याचा अर्थ हा पदार्थ भारतातूनच तिकडे गेला. शिवाय वरचे आवरणही पिठापासून बनवितात. म्हणजे तर शंकेला जागाच नको. मी चीनला गेलेलो नाही
किंवा हा पदार्थही खाल्लेला नाही. मात्र मी मोदक भरपूर खाल्लेले आहेत आणि त्यावरून हा मोदकाचाच प्रकार आहे हे ठामपणे सांगू शकतो. त्यात मांस कोंबण्याची कल्पकता दाखविणाऱ्या चीनी लोकांबद्दल काय बोलावे? त्यामुळेच असावे, इंडोनेशिया किंवा थायलंडमध्ये गणपतीच्या मूर्ती आढळत असल्यातरी चीनमध्ये आढळत नाहीत.
No comments:
Post a Comment