- माणूस चित्रपट पाहायला का जातो?
- मनोरंजन हवे म्हणून.
- जगाच्या समस्यांबद्दल काथ्याकूट करायचा असतो म्हणून.
- चित्रपट महामंडळ किंवा आपली ज्यांच्याशी घसट असते अशा गुंडांकडे भरपूर पैसा असतो म्हणून.
- दिग्दर्शकाचे आयुष्य किती कंटाळवाणे आणि किळसवाणे आहे, हे प्रेक्षकांना कळालेच पाहिजे म्हणून.
- स्लमडॉग मिलिनियर अप्रतिम चित्रपट का आहे?
- तो पाश्चात्य दिग्दर्शकाने काढलेला आणि पाश्चात्याळलेल्या लेखकाच्या कादंबरीवर आधारीत आहे म्हणून
- त्याला प्रतिष्ठीत ऑस्कर पुरस्कारांचे नामांकन मिळालेले आहे म्हणून.
- त्यातील मोठ्या अभिनेत्यांपेक्षा लहान मुलांनी अधिक चांगला अभिनय केला आहे म्हणून.
- या वर्षी दुसरा कोणताच चांगला चित्रपट आला नाही म्हणून.
- स्लमडॉग मिलिनियर याचा नक्की अर्थ काय आहे?
- झोपडपट्टीत राहणारी कुत्री कधीतरी लक्षाधीशही होऊ शकतात.
- झोपडपट्टीत लक्षावधींच्या संख्येने श्रीमंत लोकं कुत्र्याचं जगणं जगतात.
- लक्षाधीश असणाऱया व्यक्तींना झोपडपट्टीतील लोंक कुत्र्याप्रमाणे वाटतात.
- भारतीय़ लोकं आता लाखो रुपये कमावत असली तरी त्यांची खरी जागा झोपडपट्टीतच आहे.
- स्लमडॉग मिलिनियरमध्ये झोपडपट्टीतील जीवनाचे जीवंत चित्रण आहे, असे बहुतांश प्रेक्षकांना का वाटते?
- चित्रपटात झोपडपट्टीचे हुबेहुब दर्शन घडविले आहे.
- चित्रपटाच्या फ्रेम संथपणे हलत असल्या, की चित्रपटात काहीतरी जीवंत आहे असे समीक्षकांना वाटत असते.
- प्रेक्षकांनी कधी झोपडपट्टीचे जीवन जवळून पाहिलेले नसते.
- झोपडपट्ट्यांतही अलीकडे झपाट्याने आधुनिक जीवनशैली प्रवेश करत आहे.
- स्लमडॉग मिलिनियरबाबतच्या कोणत्या गोष्टीला तुम्ही दाद द्याल?
- आपल्या मनातील ठाशीव प्रतिमा पडद्यावर उतरून त्यामागे मोठे संशोधन असल्याचा दावा करणाऱया दिग्दर्शकास
- केवळ ऑस्करसाठी नामांकन झालेले असल्यामुळे चित्रपटाबद्दल पाने भरभरून लिहिणाऱया समीक्षकांस
- हजारो फ्रेम्सच्या ठिगळांना फक्त जाहिरातीच्या बळावर चित्रपट म्हणून खपविणाऱया मार्केटिंगच्या तंत्रास
- दोन आठवड्यांपासून चित्रपटाचे खेळ जोरात चाललेले असतानाही गरीब मुलांसाठी चित्रपटांचे मोफत खेळ आयोजित न करणाऱया सामाजिक संघटनांना
- थ्री मस्केटिअर्स ही कादंबरी काय आहे?
- इंग्रजी साहित्यातील मापदंड मानली जाणारी कांदबरी
- महापालिकेच्या शाळेतील तिसरीच्या विद्यार्थ्यांना लावलेले पाठ्यपुस्तक
- बाजारातील विक्रीमूल्य संपलेले एक पुस्तक.
- मानवी जीवनाबद्दल अडीच तासांत चिरंतन सत्य सांगणारा एक पवित्र ग्रंथ.