Sunday, June 24, 2007

शिवाजीचा पोवाडा

एक ऐतिहासिक परीक्षण
महाराष्ट्र भूमी कलावंतांची, पडेल पिक्‍चर्सची, फालतू बॉलिवूडची ग ग ग ग गऽऽऽऽऽऽ
महाराष्ट्र भूमी कलावंतांची, पडेल पिक्‍चर्सची, फालतू बॉलिवूडची, रडक्‍या चित्रपटांची
पिक्‍चर्सचा धंदा कसला हो जी जी धंदा कसला हो जी जीऽऽ
त्यात आला आता ‘बॉस शिवाजी’ हो जी जीऽऽ आला शिवाजी हो जी जीऽऽ
शाहिर ः काळा कभिन्न रजनीकांत, त्याला मानी कोणी ना कलावंत
तो गेला तमिळनाडूत, अन्‌ सुपरस्टार झाला हो जी जी झाला हो जी जीऽऽ
त्याने घेतले सोळा कोटी, त्याची चर्चा किती पराकोटी
पिक्‍चर यायची खोटी, बुकिंग फुल्ल झाली हो जी जी फुल्ल झाली हो जी जीऽऽ
त्याला बघायला ही गर्दी, त्यात होते किती दर्दी, त्यात काहींना ऍलर्जी तमिळ चित्रपटांची जी जीऽऽ
तमिळ चित्रपटांची गोष्ट, ग ग ग ग ग गऽऽऽ तमिळ चित्रपटांची गोष्ट भली आगळी, रित सारी वेगळी, तोंडे जरी काळी, कला लई भारी त्याचंच रूप शिवाजी र जी जी शिवाजी र र जी जी
शाहिर ः अरुमुगम शिवाजी एनआरआय, त्याला परदेशी पडेना चैन
द्याया गरिबांना शिक्षण, तो येई मायभूमी परतून जी र जी जी जी र जी जीऽऽ
त्यास करती विरोध कितीक, देई लाच ठायी ठाय
त्यापायी होई कफल्लक, अन्‌ मागे भीक जी र जी जी जी र जी जीऽऽ
भीक मिळता रुपयाची, त्यातून करे कोटी कोटी, पुन्हा होय श्रीमंत ग ग ग ग गंऽऽऽऽऽ
भीक मिळता रुपयाची, त्यातून करे कोटी कोटी, पुन्हा होय श्रीमंत चुटकीसरशी, करे मतलबाची पूर्ती त्याच्या ईस्टाईलने जी जी ईस्टाईलने जी जीऽऽ
शाहिर ः या स्टोरीतच त्याची लवस्टोरी, त्याला मिळे एक गोरी पोरी
तिचे साधेपण लई भारी, शिवाचीचा जीव घेई,
घेऊन सवे नातेवाईक, शिवाजी पोचे तिच्या घरी
नाना करून गंमती जमती, लग्नास करे राजी
लग्नासाठीच्या ज्या खटपटी, बसे कनपटी, रंगरंगोटी लई गमती ग ग ग गऽऽऽऽ
लग्नासाठीच्या ज्या खटपटी, बसे कनपटी, रंगरंगोटी लई गमती त्यात जाई निम्मा वेळ नंतर सारा खेळ जी सारा खेळ जी जी
शाहिर ः म्हाराजा, यानंतर येई कथेला वेग
शिवाजी’ लई जोरदार, दाखवी अंगचा प्रताप
त्याच्या स्टाईलला नाही तोड, जगावेगळी मारधाड
दुश्‍मनांना नाही पारावार, त्यांच्या उरावर शिवाजीचे वार
रजनीचे नाना रूप, धक्के पण खूप, सज्जनांना हुरूप ग ग ग गऽऽऽऽ
रजनीचे नाना रूप, धक्के पण खूप, सज्जनांना हुरूप साडे तीन तासांचा खेळ दाखवी ‘दि एंड’ प्रेक्षक पडती बाहेर वाजवीत शीळ हो जी वाजवीत शीळ हो जी जी हो जी जी
शाहिर ः पिक्‍चरचा डायरेक्‍टर शंकर, त्याच्या यशाची वर कमान
आता मात्र सुटला तोल, सुपरस्टार ठरे वरचढ
त्यातही काही प्रसंग, आणती सिनेमात रंग
गाणी मात्र जोरदार, त्याला रहमानची जोड
देखणा सोहळा हो जी जीऽऽ सोहळा हो जी जीऽऽऽ
शिवाजीत पैसा वसूल, म्हणे रजनी ‘कूल’, मनोरंजन फुल्ल ग ग गऽऽऽ ग गऽऽ
शिवाजीत पैसा वसूल, म्हणे रजनी ‘कूल’, मनोरंजन फुल्ल, चाले हाऊसफुल त्यातच त्याचे यश हो जी जीऽऽ त्याचे यश हो जी जीऽऽ

5 comments:

  1. D.D. Don nw become `Shahir`?
    Wel, powada avadla. meeting-meeting var kahi powada karat yeil kay? We r waiting...

    Prashant.

    ReplyDelete
  2. It seems that you are a die hard Rajni fan. I don,t know weather this movie is Rajni's masterpiece or not. But this article is certainly a masterpiece. Not only because of the content but also because of the form you have chosen to write a film review.
    This is a splendid manifestation of your craze for the hero and also the various aspects you have taken into account while wathing and writing about the film.
    One thing I must appreciate, inspite of Rajni fan u do not approve the actor surpassing the director. And yes your article certainly makes me think about watching this film on the big screen.
    I am waiting for many more film reviews from you.

    sagar gokhale

    ReplyDelete
  3. good powada...dont compaire marathi and hindi movies with telugu and tamil movies... otherwise its ok.

    Ashish Chandorkar

    ReplyDelete
  4. डीडी........
    एखाद्या पिक्‍चरची चांगली व वाईट गोष्ट काय हे तुम्हाला विचारायला हवे.
    का कुणास ठाउक पण माझ्या मते चित्रपटाची कथानक वाचून तो चित्रपट पाहणे अधिक चांगले, कारण नेमके कळते की काय वाईट आणि काय चांगले...
    तुमचा अनुभव चांगला दिसतोय......
    पिक्‍चर तर पाहणारच आहे....
    किरणकुमार.......

    ReplyDelete
  5. रजनीला तमिळनाडूत मिळाले नाहीत, एवढे fans महाराष्ट्रात मिळवून द्यायचा विडाच आपण उचललेला दिसतोय.

    ...लगे रहो!

    पोवाडा चान झालाय, पण जरा आटोपता घ्यायला हवा होता. मारुतीच्या शेपटासारखा लांबलाय...सो.
    पुढच्या चित्रपटापर्यंत हे दुकान चालवू नका, म्हणजे मिळवली!

    -अभिजित पेंढारकर.

    ReplyDelete